उंब्रज पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोर जेरबंद

Thu 22nd Feb 2024 10:51 pm
सर्तक नागरिकांमुळे व सर्तक उंब्रज पोलीसांमुळे मोटर सायकल चोरटा जेरबंद व ४०,०००/-रुपयेचा मुद्देमाल हस्तगत

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरटा रंगेहात जेरबंद झाला आहे.बुधवार दि. २१ रोजी रात्रौ ११.०० ते दि २२ रोजी सकाळी ०६.०० वा. दरम्यान चरेगांव ता. कराड गावचे हद्दीत फिर्यादी कैलास चंद्रकांत माने रा. चरेगांव ता. कराड यांचे राहते घरासमोरुन त्यांची हिरो स्प्लेंडर मोटर सायकल क्र. MH 11 AQ 7009  ही अज्ञातचोरट्याने चोरुन नेली बाबत उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता

 दरम्यान या घटनेची माहिती सपोनि रविंद्र भोरे यांना मिळाताच त्यांनी तात्काळ उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींगकरुन अज्ञात आरोपीचा व मोटर सायकलचा शोध घेणे बाबत पो. हवा. ब. नं. ९२२ जगताप, पो. हवा. १३०४साठे, पो. कॉ. ब. नं. २८ पाटील, पो. कॉ. ब. नं. २४६७ पवार, पो. कॉ. ब. नं. २५१६ माने, पो. कॉ. ब. नं.१९१० थोरात, पो. कॉ. ब. नं. २३६६ कोळी, पो. कॉ. ब. नं. १०१८ पवार यांना सुचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस स्टाफ हे उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना मौजे उंब्रज ता. कराड गावचे हद्दीत पाटण ते उंब्रज जाणारे रोडवरील आनंद पेट्रोल पंपा जवळ रोडचे कडेला एक इसम संशयीत रित्या मोटरसायकल घेवून उभा असलेला दिसल्याने त्यास चरेगांव गावतील नागरीक तसेच पोलीस स्टाफ यांनी त्यास पकडून सदर इसमाचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विमल गुलजार माझी वय - ३८ वर्षे रा. मुशहरीटोला, ग्राम मंगलापूर पोस्ट मंगलापुर थाना संग्रामपुर पुर्वी चम्पारण संग्रामपुर, बिहार असे असलेचे सांगितले त्यावेळी त्याचे ताब्यातील मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी सदर मोटरसायकल ही चरेगांव गावातून चोरलेली आहे अशी कबुली दिलेने त्यास ताब्यात सदर गुन्ह्यचे तपास कामी अटक करणेत आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक. समीर शेख , अप्पर पोलीस अधिक्षक आचंल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर,पोलीस निरीक्षक स्थागुशा अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक रविंद्रभोरे, पो. हवा. सचिन जगताप, पो. हवा. संभाजी साठे, पो. कॉ. हेमंत पाटील, पो. कॉ. निलेश पवार, पो. कॉ.श्रीधर माने, पो. कॉ मयुर थोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. प्रशांत पवार तसेच मौजे चरेगांव ता.कराड गावातील नागरिक यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो. हवा.सचिन जगताप हे करीतआहेत.