उंब्रज हद्दीतील तारळी पूलानजीकची घटना ; घटनास्थळावरून डंपर चालक पसार
उंब्रज / प्रतिनिधी
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता. कराड) गावच्या हद्दीत तारळी पूलानजीक डंपरची पुढे चाललेल्या दूचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी होऊन ठार झाला तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना दि.२८ रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.अपघात प्रकरणी डंपर चालकावर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अभिषेक अनिल कदम रा. मालगाव ता. जि. सातारा असे ठार झालेल्याचे नांव आहे तर सुमित लक्ष्मण भोसले (वय३१)रा. खरशी ता. जि. सातारा असे जखमीचे नांव आहे.
याबाबत जखमी सुमित लक्ष्मण भोसले (वय३१)रा. खरशी ता. जि. सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,
फिर्यादी सिल्पा कंपनीत एम आरचे काम करत असून मित्र अभिषेक कदम हे दोघे युनिकॉर्न दूचाकी क्रमांक एम एच १२ पी.ई.४४७८ वरून कराड येथे कामासाठी जात असताना उंब्रज ता. कराड गावच्या हद्दीत तारळे नदीचा पुल संपल्यावर डायव्हन्शन झाल्यावर पुढे आलो दूचाकी महामार्ग रोडची साईट पट्टी वरून जात असताना अचानक पाठीमागुन आलेला पिवळ्या रंगाचा डंप्पर क्रमांक एम.एच.१३ ए.एक्स. ३३९२ ने दूचाकीला पाठीमागे धडक दिली. यामध्ये फिर्यादी पुढे उडून पडले तर अभिषेक कदम हा डोक्यावर पडला त्याच्या डोक्यातील हेल्मेट पुढे पडले होते. या दरम्यान गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. घटनास्थळावरून डंपर चालक पळून गेला. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना जखमींना रुग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या दरम्यान अभिषेक कदम यास डॉक्टरांनी मयत घोषित केले. असे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले असून डंपर चालक याच्यावर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.
...