उंब्रज/प्रतिनिधी
पुणे बंगळूर महामार्गावर पेरले ता.कराड गावच्या हद्दीत भराव पुलावर दुचाकी व ट्रक्टर अपघातात उंब्रज येथील युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवार दि. २० रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ऋषिकेश दत्तात्रय मुजुमले रा. उंब्रज असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघातात मृत युवकाचा भाऊ जखमी झाला आहे. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाब अधिक माहिती अशी की, महामार्गावर मंगळवारी २० रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पेरले ता. कराड गावच्या हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या हायवे लेनवर पेरले ब्रीजवर ट्रँक्टर व होंडा शाईन मोटरसायकल चा अपघात झाला. या अपघातात ऋषिकेश दत्तात्रय मुजुमले रा .उंब्रज ता कराड हा जागीच ठार झाला असुन चेतन दत्तात्रय मुजुमले रा .उंब्रज ता कराड हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची खबर रोहित अमृतराव पाटील रा. पेरले ता.कराड. यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास हवालदार पवार करत आहेत.