उंब्रज / प्रतिनिधी
पक्षाने सांगितले तर मलाही कराड उत्तर मधून निवडणूक लढवावी लागेल अशी खळबळजनक कबुली विक्रम पावसकर यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला दिली.पस्तीस वर्षे आमदारकी ज्यांच्या घरात आहे यांनी काम काय केल, हणबरवाडी, धनगरवाडी योजना हे स्वर्गीय पी.डी पाटील साहेबांचे स्वप्न होतं .पंचवीस वर्षे आमदार त्यापैकी अडीच वर्षे मंत्री असून ज्यांना स्वताच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आलं नाही ते कराड उत्तरचे स्वप्न काय पूर्ण करणार हे जनतेला फसवत असून मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आलंय त्यामुळे आता शरद पवार पावसात भिजले काय ,उन्हात उभे राहिले काय कराड उत्तर मध्ये परिवर्तन अटळ आहे . जिल्ह्यातील आठच्या आठ उमेदवार हे महायुतीचे निवडून येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले उंब्रज येथील भाजप कार्यालयात आयोजित महायुतीच्या रिपोर्ट कार्डच्या वाचन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते.
याप्रसंगी विक्रम पावसकर,धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, संपतराव जाधव,शंकरराव शेजवळ, सुरेशराव पाटील , सचिन नलवडे, महेशकुमार जाधव, उंंब्रजचे सरपंच योगराज जाधव , भिमराव पाटील, भाजप , शिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षातील पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
हो पृथ्वीराज चव्हाण पराभूत होणार
धैर्यशील कदम यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येणार असल्याबाबत सांगितले यामध्ये कराड दक्षिण सुद्धा असून एकेकाळी जयकुमार गोरे व धैर्यशील कदम यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कृपादृष्टीमुळे हजारो कोटींचा निधी मिळाल्याच्या आणाभाका याच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात घेतल्या होत्या पण...........आज त्यांनाच पराभूत करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्ष यांना धावपळ करावी लागणार आहे .
कराड उत्तर मधील दुष्काळी भागासाठी अनेक पाण्याच्या योजनांना पैसे देण्याचे आश्वासन न देता तसेच नुसते न बोलता प्रत्यक्षात निधी दिला. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव दिला, सोयाबीन साठी जादा दर मिळवण्यासाठी प्रयत्न केले परंतु शेतकऱ्यांच्या मालाला जरा दर वाढला की ज्यांना जास्तीचा पगार आहे अशीच मंडळी ओरड चालू करतात. लाडक्या बहिणी योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली परंतु येत्या निवडणुकीत महायुतीचे सरकार आणण्यात लाडक्या बहिणींच निर्णयाक कौल देतील. विरोधकांना फक्त सत्ता हवी आहे त्यासाठी जाती जातीत भांडण लावली परंतु महायुतीने समाजातील सर्व घटकांना फायदेशीर अशा अनेक योजना आणल्या व त्या अंमलात आणल्या मग जनतेसमोर आलोय त्यामुळे कराड उत्तर मधील बिनकामाच्या, निष्क्रिय आमदाराला घरी बसून महायुतेचा आमदार होईल.
तर कराड दक्षिण मध्ये अतुल भोसले यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे झाली आहेत त्यामुळे कराड दक्षिण मध्ये पुर्ण ताकदीने भाजप त्यांच्या पाठीशी उभे असणार असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले याप्रसंगी बोलताना मनोज घोरपडे म्हणाले प्रत्येक निवडणुकीत मागचे विसरून पुढे काय करणार हे सांगितले जाते पण महायुतीच्या सरकारने प्रथमच काय केले हे सांगण्यासाठी हे रिपोर्ट कार्ड तयार केल आहे. महायुतीच्या सरकारने कराड उत्तर मध्ये भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे गेल्या अडीच वर्षात देशाच्या, राज्याच्या विकासासाठी महायुतीची महत्त्वपूर्ण कामे झाली असल्याचे सांगितले.
कराड उत्तर ची जागा भाजपला मिळावी म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत वीस तारखेला जागा कोणत्या चिन्हाला मिळाली हे जाहीर झाल्यानंतर उमेदवार निश्चित होईल व ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी आम्ही युतीतील सर्व घटक ठामपणे उभे राहणार एकास एक उमेदवार असणार असल्याचं विक्रम पावसकर यांनी यावेळी सांगितले.