मांडूळाची तस्करी करणारी टोळी जेरबंद

Sat 17th Feb 2024 07:17 pm
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस उपनिरीक्षक अशोक मदने, सहा.पोलीस फौजदार काळे, खराडे, हवालदार आप्पा औबासे, भोसले, संदेश दिक्षीत, निलेश विभुते, सुशांत कुंभार, महेश शिंदे यांनी केली.

उंब्रज/प्रतिनिधी


  सर्प जातीच्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील टोळीला तळबीड पोलीसांची जेरबंद केले आहे. एक कोटी दहा लाख रुपये किंमतीचे मांडुळाची तस्करी रोखण्यात पोलीसांना यश आले आहे. १६ रोजी पोलीसांनी ही कारवाई केली असून कारवाई संदर्भात शनिवारी १७ रोजी सायंकाळी ५ .०० वाजण्याच्या सुमारास माहीती देण्यात आली. 


      याबाबत पोलीसांनी सांगितले की, शुक्रवारी १६ रोजी सायंकाळी तळबीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रालिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस काॅन्स्टेबल निलेश विभुते यांना खात्रीशिर माहीती मिळाली की,कराड ते सातारा जाणारे हायवे वर वराडे या गावमध्ये जय शिवराय हॉटेल जवळ काही लोक बेकायदेशीर सर्प जातीची मांडुळ विक्रीसाठी घेवुन येणार आहेत. माहितीच्या आधारे  तळबीड पोलीसांनी  जयशिवराय हॉटेलच्या आजुबाजुस सापळा लावुन वॉच सुरू केला. या दरम्यान सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास तीनजण मोटार सायकलवरुन जय शिवराय हॉटेल समोरील रिकाम्या जागेत येवुन थांबले होते. त्याच्या हालचाली संशयीत वाटल्याने व बामतीदाराने दिलेल्या वर्णना प्रमाणे त्यांचे वर्णन असल्याने  पोलीसांनी  त्यांना घेराव घालूुन ताब्यात घेतले.  रुपेश अनिल साने वय-२५ रा आड ता. पोलादपुर जि रायगड, अनिकेत विजय उत्तेकर वय-२७ रा कापडखुर्दे ता. पोलादपुर जि रायगड, आनंद चंद्रकांत निकम वय-३५ रा कापडखुर्दे ता. पोलादपुर जि रायगड अशी  त्यांची नावे आहेत.  त्यांच्या जवळील एका पुट्याच्या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये सर्प जातीचे मांडुळ मिळन आले. सदर बाबत वराडे येथील वनपाल सागर कुंभार यानी मांडुळ असल्याचे खात्री केली.पोलीसांनी  संशयितांची चौकशी केली असता त्यांनी मांडुळ हे आनंद चंद्रकांत निकम यास शेतात काम करीत असताना दहा दिवसापर्वी मिळून आले असून ते आम्ही एक कोटी दहा लाख रुपये या किंमतीला विक्रीसाठी घेवून जात होतो. त्या तिद्यांविरुध्द तळबीड पोलीस ठाण्यात वन्यजीव प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कराड यांच्याकड़ सुरक्षितेच्या दृष्टीने सदरचे मांडुळ त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक आरोपी यांच्याकडे अधिक तपास चालु असल्याचे पोलीसांनी सांगितले. 


सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक  किरण भोसले, पोलीस उपनिरीक्षक अशोक मदने, सहा.पोलीस फौजदार काळे, खराडे, हवालदार आप्पा औबासे, भोसले, संदेश दिक्षीत, निलेश विभुते, सुशांत कुंभार, महेश शिंदे यांनी केली.