प्रगती शिंदे हिचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरोग्य विभागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्रगती सतीश शिंदे हिचा सत्कार करताना देवराज पाटील व ग्रामस्थ
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून युवा पिढीला असामान्य कर्तृत्व करून दाखवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन, चिकाटी व अभ्यासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे. पाल येथील शेतकरी सतिश शिंदे यांची कन्या प्रगती शिंदे या विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून पाल गावचे नावलौकिक वाढवला आहे. असे प्रतिपादन कराड पंचायत समितीचे माजी सभापती व पाल देवस्थानचे अध्यक्ष देवराज पाटील यांनी व्यक्त केले.
पाल ता. कराड येथील प्रगती सतीश शिंदे हिने महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या सप्टेंबर २०२३ मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरोग्य विभागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला याबद्दल तिचा पाल येथे देवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.