तळबीड पोलिसांची कारवाई
उंब्रज / प्रतिनिधी
सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या खुनप्रकरणातील चार संशयित आरोपी एका वाहनातून टोल नाका ओलांडून पुढे जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार तात्काळ हालचाली करत तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदी राबविण्यात आली. नाकाबंदी दरम्यान संबंधित वाहन अडवून चौघांनाही ताब्यात घेण्यात आले.
सोलापूर क्राईम ब्रँचचे अधिकारी API काळे व त्यांचा स्टाफ आरोपींचा शोध घेत मार्गावर होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जेल रोड पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे नोंद असलेल्या CR. No. 05/2026 (BNS 103, 109, 189(1)(2), 190, 191(2)(3), 49, 352, 351(2), आर्म्स अॅक्ट 4/25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135) अंतर्गत आरोपी—
शंकर बाबू शिंदे (वय 62),सुनील शंकर शिंदे (वय 36),
आलोक तानाजी शिंदे (वय 21) –सर्व रा. रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर,आणि महेश शिवाजी भोसले (वय 34, रा. माळेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर)हे टाटा नेक्सॉन (MH13 EK 5553) या वाहनातून आनेवाडी टोल नाका ओलांडून कराडच्या दिशेने जात असल्याची माहिती होती.
त्याअनुषंगाने तासवडे टोलनाक्यावर पोलिस ठाण्याकडील स्टाफच्या मदतीने तात्काळ नाकाबंदी करण्यात आली. वाहन तपासणीदरम्यान वरील चारही आरोपी वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी रात्री सुमारे 11.00 वाजता आरोपी व वाहन सोलापूर क्राईम ब्रँचचे अधिकारी व त्यांच्या स्टाफच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तळबीड पोलीस ठाण्याकडील API भोसले, ASI रजपूत, पोलीस अंमलदार अभय मोरे, प्रवीण गायकवाड, सुशांत कुंभार तसेच LPC शितल मोहिते यांनी ही यशस्वी कारवाई केली.